फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
गुन्हेगारी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील चार गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील चार गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई!

विकी जाधव, राहुल लोहार, विक्रांत देवकुळे व अमित पठारे या चार टोळ्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई
पिंपरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी शहरातील विकी जाधव, राहुल लोहार, विक्रांत देवकुळे व अमित पठारे या चार टोळ्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई चिखली पोलीस ठाणे, भोसरी एमआयडीसी पोलीस, दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील या प्रमुख गुन्हेगारी टोळ्या आहेत. गेल्या दोन महिन्यात यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. टोळी प्रमुखांसह त्यांच्या साथीदार 29 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

आपल्या आर्थिक फायद्यासाठी लोकांमध्ये दहशत राहावी हाच यामागील उद्देश आहे. या टोळ्यांची दहशत आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आला होता. कागदपत्रांची छाननी करून चार गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलमानुसार कारवाई करण्याचे आदेश सारंग अवाड (अप्पर पोलीस आयुक्त) यांनी दिले होते, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 मध्ये आज पर्यंत 35 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 179 आरोपींवर मोका कायदे अंतर्गत कारवाई केली आहे .नोव्हेंबर व डिसेंबर 2025 मध्ये चार डोळ्यांमधील 29 गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली .

 मोका अंतर्गत कारवाईतील आरोपी
1) चिखली पोलीस ठाणे :-अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव (वय 28 ,रा. जाधव वस्ती, रावेत) (टोळीप्रमुख) ,सोहन राजू चंदेलिया (वय 23 ,रा. जाधव वस्ती, डी मार्ट च्या मागे रावेत), प्रद्युमन राजकुमार जवळगे (वय 25, बंगला वस्ती ,मेदनकरवाडी, चाकण ), यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे (वय 21, रा. पीसीएमसी कॉलनी, बिल्डिंग नंबर 9/ 43 अंकुश चौक, निगडी), अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार (वय 22 ,रा. भोंडवे वस्ती, मोरया कॉलनी वाल्हेकरवाडी, चिंचवड ),शुभम गोरखनाथ चव्हाण (वय 30 ,रा. बी पब्लिक 11, सुखवानी प्लाझा ,आकुर्डी), अनिकेत अशोक बाराथे (वय 27, जय भीम नगर ,दापोडी ,पुणे), अश्विन सुधीर गायकवाड (वय 21, जय भीम नगर, दापोडी), यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा (वय 19, विनायक नगर, सांगवी ) व पाच अल्पवयीन बालके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या टोळीप्रमुख व त्यांच्या साथीदारांवर एकूण 15 गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.

2) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे :- राहुल आप्पासाहेब लोहार (वय 27 रा. चंदनवाडी, उरुळी कांचन, टोळीप्रमुख ),ऋतिक प्रकाश गायकवाड (वय 24 ,रा. खंडोबा माळ, चाकण), आकाश दिनकर गायकवाड (वय 24, संजय गांधी नगर, मोशी ),गणेश बबन वहिले (वय 23 ,गायकर वस्ती ,डुडुळगाव), शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे (वय 24, रा. डुडुळगाव मोशी )यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्यांचे साथीदारांवर दहा गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.

3) दिघी पोलीस स्टेशन :- विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे (वय 24, रा. दुर्गामाता मंदिर ,लेन नंबर 12, गणेश नगर ,बोपखेल टोळीप्रमुख), सुरज राजू चव्हाण (रा. गणेश नगर रोड, बोपखेल), साहिल उर्फ विश्वास मुकेश लोट (वय 19, रा. गणेश नगर कॉलनी, नंबर तीन, बोपखेल), शुभम सुमित डिंगिया (वय 24 ,बालाजी रामनगर, बोपखेल) या टोळीप्रमुख व त्यांचे साथीदारांवर सात गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आली आहे.

4) दिघी पोलीस स्टेशन:- अमित जीवन पठारे (वय 33, रा. पठारे मळा, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, टोळीप्रमुख) विक्रांत सुरेश ठाकूर (वय 38, माळवाडी गणपती मंदिर शेजारी, सोळू ,ता. खेड), सुमित फुलचंद पटेल (वय 31, रा. पसायदान कॉलनी, गायकवाड नगर, दिघी, ता. हवेली), आकाश सोमनाथ पठारे (वय 23 ,रा. पठारे मळा, चऱ्होली, बुद्रुक ता. हवेली) सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 24, रा सोळू, ता. खेड) किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर (रा. वडमुखवाडी, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) या टोळीप्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर एकूण सात गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आली आहे.

वरील टोळी प्रमुख व त्यांच्या साथीदारांनी चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहूरोड, एमआयडीसी भोसरी, दिघी, हिंजवडी, दिघी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकी, कोंढवा, उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून, दरोडा ,जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, अमली पदार्थ विक्री करणे, अपहरण, अग्निशस्त्रे व घातक हत्यार जवळ बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोका लावण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सहा.आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त मारुती जगताप (परि .3 ),पोलीस उपायुक्त शिवाजी पवार (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे (गुन्हे एक) त्यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल साळुंखे चिखली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, गणेश जामदार एमआयडीसी भोसरी पोलीस निरीक्षक, श्रीपाद वाघ दिघी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, श्रीमती रूपाली बोबडे (पीसीबी गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस फौजदार सचिन चव्हाण ,पोलीस हवालदार व्यंकप्पा कारभारी (पीसीबी गुन्हे शाखा) पोलीस हवालदार कुमार कदम चिखली पोलीस स्टेशन , निलेश आरगडे एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन, शरद विंचू ,शशिकांत पवार दिघी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने ही कोमगिरी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"