फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, पोलीस अधिकारी पांढरे यांच्यावर कारवाई करावी!

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, पोलीस अधिकारी  पांढरे यांच्यावर कारवाई करावी!

अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी
 पिंपरी : हिंजवडी पांडवनगर या ठिकाणी दि. ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ ते ३ चे दरम्यान शेतकरी बांधव, पी एम आर डी चे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर अतिक्रमणाबाबत चर्चा करीत असताना त्यांचे समक्ष हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पी. आय बालाजी पांढरे यांनी सदर चर्चेमध्ये खंड पाडून काही शेतकरी बांधव यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करणेस सुरुवात केली. सदर वरिष्ठ पी आय यांच्या या कृत्यास उपस्थित असलेले सर्व नागरिक यांनी विरोध केला असता त्यांनी पोलिस बळाचा गैरवापर करुन शेतकरी बांधव व नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. असा आरोप  अखिल भारतीय छावा संघटनेने केला असून वरिष्ठ पी. आय बालाजी पांढरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

viara vcc
viara vcc

अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे म्हणाले की हिंजवडी येथिल हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पी. आय बालाजी पांढरे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केलेली अरेरावी आणि शिवराळ भाषा अशोभनीय आहे. सरकारचा आणि पी एम आर डी चा जो चाललेला अनागोंदी कारभार शेतकऱ्यांना मारणारा आणि हिंजवडी मान, मारुंजी रोड येथील बिल्डर लॉबीला तारणारा आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून सरकारने भविष्यातील निर्णय घ्यावा. नुकतीच आम्ही पिंपरीची चिंचवडचे पोलिस आयुक्त यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. सदरील अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास छावा संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश अध्यक्ष व शेतकरी नेते व विजय घाडगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या, मग्रूर, मदमस्तवाल पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यांच्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करण्यात यावी. शांतपणे चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पी. आय बालाजी पांढरे यांनी चर्चेत सहभागी होण्यासाठी बोलवले असता त्यांनी त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत आणि शिवराळ भाषा वापरली. ही अत्यंत चुकीची आहे.

संबंधीत घटनेतील दोषींवर कारवाई न झालेस अखिल भारतीय छावा संघटने मार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणेत येईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचे मनोज आण्णा मोरे – प्रदेश महासचिव, मच्छिंद्र चिंचोळे – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अक्षय बोडके – पुणे जिल्हा अध्यक्ष, प्रशांत फड सर – शिक्षक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष, सचिन लिमकर – पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि अन्याय ग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"