फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
पिंपरी-चिंचवड

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध 31 डिसेंबर पर्यंत कारवाई मोहीम!

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध 31 डिसेंबर पर्यंत कारवाई मोहीम!

पिंपरी : मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध बुधवार 31 डिसेंबर पर्यंत विशेष मोहीम चालू ठेवली जाणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा विवेक पाटील यांनी दिली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वाहनचालक मद्य पिऊन वाहन चालवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

viara vcc
viara vcc

20 ते 28 डिसेंबर पर्यंत मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध आणि काळी काच असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. यासाठी वाहतूक शाखे अंतर्गत सर्व विभागांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या एकूण 365 वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच काळी काच असलेल्या 1156 वाहनांवर कारवाई करून 13 लाख 84 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील सर्व वाहन चालकांना वाहतूक विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, मद्य प्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करून स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुरक्षित ठेवणे बाबत जबाबदारी घ्यावी असे सांगण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"