Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा!

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा!

पिंपरी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाची सक्त मजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. महेंद्र अंशू साहू असे शिक्षा ठोठवलेल्या आरोपीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात 2017 मध्ये भारतीय दंड संहिता तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण (पॉस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार प्राप्त होताच वाकड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. वडगावकर यांच्या न्यायालयात झाली.

सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे साक्षीदारांची साक्ष आणि तपासातील पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्यानुसार आरोपीस एक वर्षाची सप्तमजुरी, पाचशे रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलिस अंमलदार विजय घाडगे यांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस नाईक निलेश एस दरेकर, पोलीस हवालदार शंकर फलके यांनी खटल्यातील साक्षीदार यांना न्यायालयात हजर ठेवण्यासाठी सतत पाठपुरावा करून गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा लागण्याकरिता विशेष प्रयत्न केले अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे प्रदीप जाधव यांनी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"