Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

अल्पवयीन पीडीतेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस 20 वर्ष सक्त कारावास!

अल्पवयीन पीडीतेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस 20 वर्ष सक्त कारावास!

पिंपरी : अल्पवयीन पीडीतेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस दोषी ठरवून विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पिंपरी-चिंचवड सत्र न्यायालय एस. एन. यादव यांनी आरोपी रामू कुंजल निषाद (वय 40) या आरोपीस वीस वर्षाच्या कारावासाची आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

viara vcc
viara vcc

रामू कुंजल निषाद (वय 40, शंभू कॉलनी, विनायक नगर, मोशी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर गुन्हा 3 एप्रिल 2026 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चैत्राली भिसे यांनी केल्यानंतर तीस दिवसाच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सदरचा खटला जलद गतीने चालवण्यात यावा याकरिता अभियोग पक्षाच्या वतीने न्यायालयात विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून सदर प्रकरणाची सुनावणी जलद गतीने पूर्ण करून 22 सप्टेंबर 2026 रोजी याबाबतचा निकाल दिला आहे.

indra dairy
indra dairy

सर्व शिक्षा एकत्रित भोगावच्या
न्यायालयाने बीएनएस कलम 64 (1) अंतर्गत वीस वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, बीएनएस कलम 65 (2) अंतर्गत वीस वर्षे करावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त करावास, कलम 74 (3) वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, कलम 351 अंतर्गत तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त करावास, पोस्को ॲक्ट कलम चार नुसार वीस वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त करावास, पोस्को ॲक्ट कलम सहा अंतर्गत वीस वर्षे करावास, रुपये दहा हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, पोस्को ॲक्ट कलम 8 अंतर्गत पाच वर्षे कारावास, व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास. वरील सर्व शिक्षा एकत्रित भोगावच्या आहेत.

या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता श्रीमती स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकार पक्षातर्फे साक्षीदार यांची साक्ष घेऊन बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार एस आर सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात प्रभावी समन्वय साधला. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ- 3 चे मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन गणेश जामदार, पोलीस निरीक्षक गुन्हे भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"