तडीपार आदेशाचे उल्लंघन आरोपीस अटक!

पिंपरी : दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराने मुदत पूर्ण होण्याआधीच हद्दीमध्ये प्रवेश करून स्वतःकडे प्रतिबंधित शस्त्र कोयता बाळगल्याने त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तानाजी कलाटे उद्यानाजवळ, मोकळ्या मैदानात शंकर कलाटे नगर, वाकड येथे करण्यात आली.

याप्रकरणी मोहम्मद गौस रफिक नदाफ पोलीस हवालदार, वाकड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. साहिल युनुस शेख (वय 22, रा. पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रोड, पॉलारीस हॉस्पिटल मागे, वाकड) असे तडीपार अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांनी आरोपी साहिल शेख यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस हद्दीतून 29 ऑक्टोबर 2024 मध्ये दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले असताना देखील आरोपीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र वापरण्यास प्रतिबंध असताना आरोपीने स्वतःजवळ कोयता बाळगून आदेशाचे उल्लंघन केले आहे. वाकड पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे व भुसारे हे तपास करत आहेत.

अल्पवयीन ट्रेनी कामगाराने ईव्ही बॅटऱ्या व ईव्ही मोटर केली चोरी!
पिंपरी : सर्व्हिस सेंटर मध्ये ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने 9 लाख 86 हजार रुपये किंमतीच्या ईव्ही टू व्हीलरच्या बॅटऱ्या व ईव्ही मोटर चोरी करून भंगार दुकानात विक्री केली. ही घटना 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत जय मातादी सर्विस सेंटर, मोहन नगर, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी सौ स्वाती मनीष मोहिते (वय 46, रा. भक्ती शक्ती अपार्टमेंट, बी- 14, गोलांडे इस्टेट लिंक रोड, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगा व भंगार दुकानातील व्यक्ती (वय अंदाजे 40, रा. भंगार दुकान चिखली, (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या जय मातादी सर्व्हिस सेंटर मध्ये ट्रेनी म्हणून काम करणारा अल्पवयीन मुलगा याने 9 लाख 86 हजार रुपये किंमतीच्या ईव्ही टू व्हीलरच्या बॅटऱ्या व ईव्ही मोटर चोरी करून भंगार दुकानात विक्री केल्या. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्ने हे तपास करत आहेत. सर्व्हिस सेंटर मधील अल्पवयीन ट्रेनी कामगाराने टीव्ही बॅटऱ्या व ईव्ही मोटर केली चोरी!

