फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
पिंपरी-चिंचवड

बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक कुमार बजाज ऑटो, याने पटकावले अजिंक्यपद!

बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक कुमार बजाज ऑटो, याने पटकावले अजिंक्यपद!

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी बुद्धिबळ स्पर्धा
 पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक कुमार (बजाज ऑटो,आकुर्डी) याने अजिंक्यपद पटकावले .या स्पर्धेचे पारितोषिक वितरण किशोर जाधव (सदस्य,फोरेशिया संचालक मंडळ), जितेंद्र निखळ (वरिष्ठ कार्यकारी व्यवस्थापक फोर्विया फोरशिया),औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,सहखजिनदार विजय हिंगे,स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,प्रीती कुलकर्णी(एडमिन मॅनेजर) यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी बोलताना किशोर जाधव म्हणाले की बुद्धिबळाचा खेळ मानसिक व्यायाम घडवितो आणि याद्वारे आपल्याला विविध प्रश्नांची उकल करण्यास मदत करतो.

viara vcc
viara vcc

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी फॉर्विया फोरेशिया कंपनी यांच्या कॅन्टीन हॉलमध्ये संपन्न झाली.ही स्पर्धा फॉर्विया फोरेशिया कंपनीने आयोजित केली.स्पर्धेमध्ये सँडविक एशिया, एसकेएफ, टाटा मोटर्स, थरमॅक्स बॅबकोक, टीकेआयएल,अम्युनिशन फॅक्टरी,ॲम्पियर कॉम्प्युटिंग,ऍप्लस एडिडा ग्रुप,एयूओ मोबिलिटी,बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, बजाज ऑटो चाकण-२, कोप्रेनस्का इंडिया, कमिंस इंडिया लिमिटेड ,डेल्टा हायड्रोलिक,इनप्रो इंडस्ट्रीज फोरशिया इमिस्सन्स,फोर्विया इंडिया,फाइन स्पार्क,आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह, इंडप्रो, जेसीबी इंडिया लिमिटेड,महिंद्रा अँड महिंद्रा, मॅक्सिओन व्हील्स ॲल्युमिनियम, माझगाव डॉक लिमिटेड,ऑर्डिनन्स फॅक्टरी देहूरोड, प्राज इंडस्ट्रीज एकूण ३० कंपन्यांच्या १४० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला .यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचाही समावेश आहे.

उपाध्यक्ष नरेंद्र कदम म्हणाले की खेळाडूंचा मिळाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून शिस्तबद्ध संघासाठी दोन व वैयक्तिक दोन बक्षीस वाढवण्यात येतील.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली मगर तर मागील वर्षाच्या प्रगतीचा आढावा व आभारप्रदर्शन औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी केले.या स्पर्धेचे संपूर्ण युट्युब प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले

याप्रसंगी जितेंद्र निखळ(ॲडमिन हेड फॉरविया),फॉरविया स्पोर्ट्स कमिटीचे दत्ता पाटील,अनिकेत आवटे,प्रणित गवंडगावे,सागर पटेकर,अभिजीत शिंदे,अजय वाल्हेकर,फ्रान्सिस मिनीजेस,प्रशांत मल्ला( ऍडमिनिस्ट्रेशन, फोर्विया),कल्याणी खडके, आकाश मस्के, बजाज ऑटो आकुर्डीचे अतुल काळोखे (एचआर मॅनेजर),दुष्यंत गायकवाड (सँडविक इंडिया स्पोर्ट्स कमिटी),संतोष शिंदे(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी),सचिन कांबळे(जेसीबी स्पोर्ट्स कमिटी),श्रीनिवास मोरे,दिनेश भुजबळ(महिंद्रा अँड महिंद्रा स्पोर्ट्स कमिटी) व औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे,खजिनदार प्रदीप वाघ,सहखजिनदार विजय हिंगे, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

स्पर्धेचे निकाल टॅक्टिकल मुव्हज चेस अकॅडमीचे आदेश इंगळे यांनी जाहीर केले.
१)प्रथम क्रमांक अभिषेक कुमार (बजाज ऑटो आकुर्डी)२)निखिल उपाध्याय (बजाज ऑटो आकुर्डी) ३)श्रीकांत मुचंडीकर (क्रोपेन्सका इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ४)अद्वैत म्हात्रे (टाटा मोटर्स लिमिटेड) ५)रामचंद्रन विजय नारायणन (मॅक्सिओन व्हील्स अल्युमिनियम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ६)रवींद्र अडकर (टीकेआयएल इंडस्ट्रीज) ७)उत्कर्ष कुमार (बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी)८) अनुराग देशमुख (आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ९) राहुल फड (फोर्विया)१०) अभिषेक कुमार (ऑर्डिनन्स फॅक्टरी ऑर्डिनन्स फॅक्टरी देहूरोड), उत्कृष्ट महिला खेळाडूचे पारितोषक मधुरा कुलकर्णी हिस मिळाले.

या स्पर्धेचे आयोजन टॅक्टिकल मुव्हज अकॅडमीचे आदेश इंगळे, अनुप पांडे, मयूर शिंदे,चंद्रकांत चौधरी यांनी केले.यावेळी स्पर्धेचे कामकाजसाठी इंटरनॅशनल ऑर्बिटर शार्दुल तपासे, सीनियर नॅशनल ऑर्बिटर अपर्णा शिंदे यांचे साह्य लाभलेले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"