फक्त मुद्द्याचं!

26th February 2026
पिंपरी-चिंचवड

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज!

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज!


शहर भाजपमध्ये दबाव व गटबाजीचे राजकारण; कोअर कमिटीच्या नावाला कात्री
 पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठीचा कोअर कमिटीने प्रदेश कमिटीकडे पाठवलेला उमेदवार आमदारांच्या दबावामुळे बदलण्यात आल्याची चर्चा सध्या शहरात जोरदारपणे चालू आहे. भाजपमधील गटबाजी उमेदवार निवडीमुळे अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले आहे.अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागा मिळाल्या आहेत. भाजपाचे स्थायी समितीमध्ये 11 सदस्य आहेत त्यामुळे जो उमेदवार निश्चित होईल तो विजयी होणार यात शंकाच नाही .स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे, संदीप कस्पटे आणि बाबासाहेब त्रिभुवन या तीन नावाबाबत चर्चा होती. मात्र अभिषेक बारणे आणि संदीप कस्पटे यांची विशेष चर्चा होती. कोअर कमिटीने याबाबत निर्णय देखील घेतला. संदीप कस्पटे यांचे नाव निश्चित करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आले होते. मात्र हा निर्णय स्थानिक आमदारांना आवडला नाही. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांकडे याबाबत तक्रार केली .कार्यकर्त्यांना या निवडीमुळे वेगळा संदेश जाईल, आमदारांची पत राहणार नाही असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आमदार सांगतील तो स्थायी समितीचा उमेदवार द्यावा असे सांगितले.  त्यानुसार अभिषेक बारणे यांचे नाव प्रदेश नेत्यांकडून निश्चित करून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या आणि त्या विरोधात आवाज उठवलेल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या पिंपरी चिंचवड भाजप मध्ये केला जात आहे. महापौर निवडणुकीच्या वेळेस देखील इच्छुक असलेल्यांना डावलून आयत्यावेळी रवी लांडगे यांचे नाव पुढे करण्यात आले. यावेळी शितल शिंदे आणि शहर भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न काटे हे इच्छुकांमध्ये आघाडीवर होते. त्यांचा पत्ता त्यावेळेस कट करण्यात आला . स्थायी समितीमध्ये संदीप कस्पटे यांचे नाव याच प्रकारे कट करण्यात आले . यावरून भाजपमध्ये दबावाचे राजकारण सध्या सुरू असल्याची चर्चा होत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"