Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

8th July 2026
गुन्हेगारी

भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण

भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : गाडीवर पावती टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी आळंदीतील मरकळ चौकात घडली.

विजय नामदेव जरे (वय ३३, रा. गोपाळपुरा, चाकण चौक, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी वाहतूक शाखेतील सहायक फौजदार अंकुश कान्हू वाडेकर (वय ५४) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाडेकर हे मरकळ चौकात वाहतुक नियमन करीत होते. त्यावेळी आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी यापूर्वी त्याच्या गाडीवर पावती टाकल्याचा राग मनामध्ये धरुन तुला माहित नाही का मी स्थानिक आहे. गाडीवर तू पावती का करतो, तुला इथे राहायचे नाही का, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांच्या अंगावरील वर्दीच्या शर्टाची कॉलर पकडून शर्टाची बटने तोडली. वाहतूक पोलिस वाडेकर यांच्या गालावर जोरात चापट मारली. त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्याने वाडेकर यांच्या डोक्यात व छातीवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे मरकळ चौकात वाहतूक कोंडी झाली. महिला फौजदार बोरकर तपास करीत आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"