टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून एका महिलेची नऊ लाख 85 हजार रुपयांनची फसवणूक!

पिंपरी : टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे आमीष दाखवून एका महिलेला नऊ लाख 85 हजार रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सहा ते नऊ जानेवारी 2026 या कालावधीत ग्रीन फील्ड सोसायटी पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी एका 43 वर्षीय महिलेने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फातिमा मेहर, सुमित सिंह आणि गौरव ट्विटर आरती शर्मा, नावाच्या टेलिग्राम आयडी वापरणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीचा नंबर एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून त्यांना वेगवेगळ्या लिंक पाठवल्या. त्यानंतर त्यांना पीएम को मिशन ग्रुप आणि व्हीआयपी ऑफिशियल या टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील करून घेण्यात आले. तिथे इतर लोकांना झालेल्या नफ्याचे फोटो दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादीला काही टास्क दिले आणि ते पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी नऊ लाख 85 हजार सहाशे चाळीस रुपये ऑनलाईन भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

