पिंपरीमध्ये रविवारी खान्देश कानबाई माता उत्सव

पिंपरी : खान्देशातील संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सण पुढील पिढयांसाठी प्रेरणादायी कसे आहेत, हे सांगण्यासाठी आणि हा वारसा अखंडीत ठेवण्यासाठी खान्देश कानबाई माता उत्सव समिती आणि पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने दोन दिवसीय उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या खान्देश दैवत कानबाई माता उत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजता आहेर गार्डन येथे महोत्सवाचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उत्सवाचे संयोजक माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी दिली.
तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथून शनिवारी सायंकाळी ५ ला गहु दळण कार्यक्रम होईल. तसेच, रविवारी दुपारी दोनला माय कानबाई भव्य मिरवणुक तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी ते आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी) येथून सूरू होवून आहेर गार्डन वाल्हेकरवाडी येथे देवीची स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी गायक अशोक वनारसे, गायिका आश्विनी भोंडवे यांचा मातेचा जागर हा सास्कृतिक कार्यक्रम होईल. सोमवारी सकाळी ८ वाजता विर्सजन मिरवणुक आहेर गार्डन ते जाधव घाट, रावेत येथे करण्यात येणार आहे.
कोण होणार सन्मानित?
यावेळी क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मुरलीधर मोहोळ, खासदार स्मिताताई वाघ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात डहाके म्हणाले, ”खान्देशात कानबाई माता उत्सव खानदेशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे. खान्देशातील ग्राम देवता कानबाईची पूजा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या उत्साहाने केली जाते. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हा सण साजरा होतो. पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या खान्देश वासियांना यानिमित्ताने आपल्या परंपरागत चालत आलेला सांस्कृतिक महोत्सव कानबाई माता उत्सव साजरा करण्यासाठी व एकत्रीत येण्यासाठी आयोजन केले आहे.’