फक्त मुद्द्याचं!

23rd April 2025
पिंपरी-चिंचवड

महानगरपालिकेच्या लेखाधिका-यांसह एकूण १३ जण सेवानिवृत्त!

महानगरपालिकेच्या लेखाधिका-यांसह एकूण १३ जण सेवानिवृत्त!

पिंपरी : सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांनी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीने केलेल्या कार्यालयीन कामकाजामुळे महापालिकेचे काम उत्तम पध्दतीने पार पडले आहे या त्यांच्या कामाचा आदर्श महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे फेब्रुवारी २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या ११ आणि स्वेच्छानिवृत्ती होणाऱ्या २ अशा एकुण १३ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रूण दगडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी सुरेंद्र देशमुखे, चारूशीला जोशी, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया जाधव, तसेच कर्मचारी महासंघ प्रतिनिधी बालाजी अय्यंगार,शेखर गावडे,नंदकुमार इंदलकर,उमेश बांदल आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक,विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये क्ष किरण शास्त्रज्ञ रसिका वाघमारे, लेखाधिकारी अनिल पासलकर, मुख्य लिपीक मंगल म्हस्के, बायोमेडिकल इंजिनिअर सुनिल लोंढे, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर सुनिल सातपुते, मुख्याध्यापक मंदाकिनी घोरपडे, रविंद्र शिंदे, शाहिदा शेख, क्रीडा शिक्षक लक्ष्मण माने, उपशिक्षिका लिला कोल्हे, रखवालदार प्रदीप गव्हाणे आदींचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार शंकरलाल चाॅवरिया, मधुकर सोनावणे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले. तर सुत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"