चिंचवड येथील एक स्वामी अवलिया :अरुण जमखंडी

चिंचवड : निसिम्म स्वामीभक्त यांनी 6 वेळा पुणे ते अक्कलकोट पायीवारी एकट्याने केली आहे. सर्व कपडे अंथरूण, पांघरून सोबत पाठीवर घेऊन, अनेक नव-नविन लोकांच्या गाठी भेटी होतं आणि ब~याच गोष्टींची अनुभुती घेतं, या वारीत त्यांना खूप वेगवेगळे अनुभव आले आहे. दररोज सुमारे 40ते 45 कि.मी. पायीवारी करुन आठ दिवसात पायीवारी पूर्णत्वास नेली जाते.

ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमा न करता स्वामींचा आशिर्वाद पाठीशी आहे, ह्या विश्वासावर ते सहज ही वारी पार पाडतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही वारी स्वामीचं करून घेतात, ते कुठेही काही कमी पडू देत नाही, आणि कोणती अडचणही येऊ देत नाही. त्याचं एकच मत आहे, गुरुपौर्णिमाला जाऊन स्वामीना एक प्रकारची गुरुदक्षिणा द्यायचा मानस आहे.
इरादे सेकडो बनते हैं …. बनके टूट जाते हैं, “अक्कलकोट वही आते है … जिन्हे स्वामी बुलाते हैं”