फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

कोकणवासींसाठी प्रवास सेवा

कोकणवासींसाठी प्रवास सेवा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवास सेवा सुलभ व्हावी, याकरिता एसटी बस सुविधा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी पाच बस कोकणात रवाना झाल्या.

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाकाराने गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासीयांसाठी एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. गेल्या महिनाभरापासून त्याचे बुकिंग सुरू होते. बुधवारी सायंकाळी पहिल्या ५ बसनी कोकणात प्रस्थान केले. यावेळी आमदार महेश लांडगे, विजय परब, विलास गवस, सुधाकर धुरी, अमित महाडिक, सुनील साळुंखे, संदीप साळुंखे यांच्यासह सर्व सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथील मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. चिखली ते दोडामार्ग, यमुनानगर ते सावंतवाडी, भोसरी ते सावंतवाडी अशा पाच गाड्या प्रवाशांना घेवून रवाना झाल्या. आज पुन्हा २१ नवीन एसटी बस प्रवाशांना घेवून कोकणात जाणार आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत कोकणमधील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. गणेशोत्सव आणि कोकणाचे अनोखं नाते आहे. कोकणात जाण्यासाठी एसटी बस पूर्ण भरतात. नागरिकांना कोकणात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे भोसरी मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी बस सुविधा सुरु केली आहे.

संप असतानाही पाच बस रवाना
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बुधवारी बुक केलेल्या पाच बस कोकणात जाणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात मध्यस्थी केली आणि कोकणवासीयांना पूर्वनियोजनाप्रमाणे प्रवास करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. त्यामुळे पाच बस रवाना झाल्या. परिणामी, कोकणवासी चाकरमान्यांचा उत्साह द्विगुणित झाला. भोसरी मतदारसंघातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी जाण्यासाठी ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी एसटी बस सोडण्यात आल्या आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"