भोसरीत संत परंपरेचा पावन सोहळा !

भोसरी : येथील मॅगीझीन चौकात नामदेव भक्त सेवा प्रतिष्ठान या मंदिरामध्ये, भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सुबक, देखण्या आणि तेजोमय मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मंगलमय विधींसह संपन्न झाली.

हा पावन सोहळा एकाचवेळी अनेक ऐतिहासिक सुवर्णयोगांनी सुशोभित झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी) जन्मवर्ष, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ३७५ वे (तृतीयशतकोत्तर अमृत महोत्सवी) वैकुंठगमन वर्ष , संत नामदेव महाराजांची ६७५ वी (षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी) संजीवन समाधी वर्ष
संस्थेचा रौप्यमहोत्सव
प्राणप्रतिष्ठा विधी मंत्रोच्चार, होम-हवन, अभिषेक व भक्तिगीतांचा गोड स्वर, टाळ-मृदंगाचा नाद आणि भाविकांच्या ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या गजराने संपूर्ण परिसर पवित्र झाला. हा सोहळा भोसरीतील उद्योजक दीपक शेठ नेवासकर आणि कैलाश शेठ नेवासकर व त्यांचे कुटुंबीय यांच्या भक्तिभावातून साकारला. त्यांनी आपल्या पिताश्री कै. पंढरीनाथ गोपीनाथ नेवासकर, मातोश्री कै. कलावती पंढरीनाथ नेवासकर, कै. राघवेंद्र विठ्ठल चिंबळकर आणि कै. श्यामशेठ ज्ञानेश्वर गवळी यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ या मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा , ह.भ.प. श्री भावार्थ देखणे, विश्वस्त, आळंदी देवस्थान आणि आमदार, महेशदादा लांडगे, , माजी. आमदार विलासशेठ लांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
या कर्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती महानंदा चिंबळकर, श्रीमती स्मिता वस्ते, श्रीमती लक्ष्मीताई गवळी, विनोद वस्ते, राजेंद्र पोरे (मुख्य विश्वस्त, नासप), राहुल शेठ गवळी, माजी नगरसेवक सागर गवळी,माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, . एकनाथ सदावर्ते, संदीप लचके, महेश मांढरे, गणेश काळे . सुभाष मुळे.पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ज़िल्ह्यातील विविध संस्थातील पदाधिकारी उपस्थित होते.
या ऐतिहासिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन दीपक शेठ नेवासकर, कैलाश शेठ नेवासकर, अरुण क्षीरसागर, मधुकर पाटसकर, सचिन नेवासकर.आणि नामदेव भक्त सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्राध्यापक डॉ. केशव बोरकर यांनी केले.

