फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
विधानसभा २०२४

काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक संपन्न

काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक संपन्न

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या राज्य नेतृत्त्वाकडून पिंपरी-चिंचवड काँग्रेसला निश्चित जागा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पुणे काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित पश्चिम महाराष्ट्र विधानसभा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार माजी मंत्री माणिकराव ठाकरे नसीम खान खासदार प्रणिती शिंदे आमदार सतेज पाटील, रवींद्र धंगेकर ,जयश्री पाटील ,संग्राम थोपटे यांच्यासह राज्यातील सर्व नेते उपस्थित होते.

या बैठकीच्या वेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघातील विधानसभा निहाय अहवाल राज्यस्तरीय नेत्यांना सादर केला आणि शहर काँग्रेसकडून विविध आंदोलने व करदात्यांसोबत संवाद यात्रा याविषयीची माहिती देत तिन्ही मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावे अशी मागणी केली सर्व मतदारसंघातील बूथ स्तरावरील माहिती दिली यावेळी राज्य नेतृत्वाकडून विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चित न्याय देण्यात येईल असे आश्वासन राज्य कमिटीच्या नेत्यांकडून देण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, श्यामला सोनवणे, निगार बारस्कर, भाऊसाहेब मुगुटमल, तुकाराम भोंडवे, बाबू नायर, अभिमन्यु दहितुले, अमर नाणेकर, संदेश नवले, वाहब शेख, चंद्रकांत लोंढे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सायली नढे, कौस्तुब नवले, प्रा. किरण खाजेकर, डॉ. मनिषा गरुड, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, विशाल सरवदे, रवि नांगरे, बाबासाहेब बनसोडे, स्मिता पवार-मुलाणी, निर्मला खैरे, अरुणा वानखेडे, वसंत वावरे, पंकज बगाडे, रवींद्र कांबळे, गौरव चौधरी, चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, राजन नायर, सौरभ शिंदे, स्वाती शिंदे, अॅड. उमेश खंदारे, सूरज गायकवाड, बाबा आलम शेख, सुरज कोथिंबीरे, तारीक रिजवी, माजिद अली, हरिष डोळस आदींसह या बैठकीस शहर काँग्रेस मधील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"