फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
पिंपरी-चिंचवड

वाचाळवीरांना जनताच धडा शिकवणार: कैलास कदम

वाचाळवीरांना जनताच धडा शिकवणार: कैलास कदम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी,प्रतिनिधी : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल बोंडे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यासमोर शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात निषेध सभा घेण्यात आली.

यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, संजय गायकवाड व अनिल बोंडे यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांना सर्व स्तरावरून जो पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळेच वैफल्यग्रस्तातून विरोधक जाणून-बुजून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी व विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा व्हावा यासाठी अशी बेताल वक्तव्य करीत आहेत. ज्या गांधी घराण्याने देशासाठी आपले सर्वस्व त्याग केले त्यांच्याबद्दल असे बोलणे हे मनोरुग्ण असल्याचे लक्षण आहे आणि अशा वाचाळवीरांना जनताच येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवेल, पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य केल्यास काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर या नेत्यांना देईल असे म्हणत निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी श्रीमती श्यामला सोनवणे, भाऊसाहेब मुगुटमल, संदेश नवले, लक्ष्मण रुपनर, किशोर कळसकर, अमर नाणेकर, चंद्रकांत लोंढे, मयुर जयस्वाल, ॲड. अनिरुद्ध कांबळे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, गौरव चौधरी, वाहब शेख, रशिद अत्तार, मुन्साफ खान, बाबासाहेब बनसोडे, डॉ. मनिषा गरूड, अर्चना राऊत, निर्मला खैरे, अरूणा वानखेडे, भारती घाग, सुनिता जाधव, सुवर्णा कदम, महानंदा कसबे, अबूबकर लांडगे, गणेश गरड, सतिश भोसले, वसंत वावरे, चंद्रशेखर जाधव, राहुल शिंपले, मकरध्वज यादव, जिफिन जॉन्सन, विशाल कसबे, राजन नायर, सुनिल राऊत, जमील औटी, सतिश नायर, सुरज कोथिंबीरे, संदीप शिंदे, अमरजीतसिंह पोथीवाल, मेहबूब मलिक, संगम गंगापुरे, भिमराव जाधव, कैलास मकासरे, साजिद खान व शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"