फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

पोलिसात लेखी तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीस बेदम मारहाण!

पोलिसात लेखी तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीस बेदम मारहाण!

पिंपरी: पोलिसात लेखी तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीस त्याची कार रस्त्यावर थांबवून बेदम मारहाण केली .ही घटना 15 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मामाजी स्वीट होम समोरील रोडवर, भांबोली, ता. खेड येथे घडली. याबाबत शुक्रवार 16 जानेवारी रोजी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

डॉक्टर राजेंद्र शेषराव वनवे वय 40, रा. गट नंबर 248, संतकृपा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, भांबोली, ता. खेड यांनी फिर्याद दाखल केली आहे. भाऊसाहेब महादू गायकवाड (वय 53, रा भांबोली गाव, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वी फिर्यादी यांनी आरोपी व त्यांचा मुलगा तुषार गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसात लेखी तक्रारी अर्ज केला होता.

त्याचा राग आरोपीने मनात धरून फिर्यादीची कार नंबर (एम. एच. 14 /एल इ 49 01) कार रस्त्यावर थांबवून फिर्यादी जवळ गेला. माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार करतोय काय थांब तुला दाखवतो असे म्हणून त्याने फिर्यादी यांचे तोंडावर हाताने फाईट मारली व शिवीगाळ करीत फिर्यादीला कारच्या बाहेर ओढले. बाजूला पडलेला एक लाकडी दांडका उचलून दांडक्याने फिर्यादी यांचे दोन्ही हातापायावर मारून त्यांना जखमी केले. त्याबाबत उत्तर माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जुंदरे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"