फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

अजित गव्हाणे यांची तळवडेत पदयात्रा

अजित गव्हाणे यांची तळवडेत पदयात्रा

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ तळवडे परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

तळवडेचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराजांना श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. भैरवनाथांच्या चरणी दंडवत घालत अजित गव्हाणे यांनी नाथ साहेबांचा आशीर्वाद घेतला. या दरम्यान गव्हाणे यांनी तळवडेतील ज्योतिबा मंदिरातही दर्शन घेतले. पदयात्रेला माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, रवी लांडगे, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे , धनंजय आल्हाट, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय भालेकर,रवींद्र आप्पा सोनवणे, माजी सरपंच चिंतामण भालेकर सहभागी झाले होते.

गव्हाणे यावेळी म्हणाले, तळवडे परिसरातील नागरिकांशी अनेकदा चर्चा होते. या भागातील मुख्य समस्या रस्त्यांची असल्याचे नागरिक सांगतात. रस्ते, आणि वीजपुरवठ्याबाबत लघुउद्योजकांशी संवाद साधला. या भागाला प्राधान्याने रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीची समस्या त्यांनी जाणून घेतली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"