कोलकातामध्ये स्फोट; महिला जखमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
कोलकाता : कोलकाता शहरातील एसएन बॅनर्जी रोडवर शनिवारी दुपारी एक मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक महिला जखमी झाली आहे. बापी दास (वय ५८) असे तिचे नाव आहे.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. दुपारी पावणे दोनच्या सुमारास तलतला पोलिस स्टेशनला ब्लोचमन स्ट्रीट आणि एसएन बॅनर्जी रोडच्या जंक्शनवर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. कोलकाता पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेंसिग टीम देखील दाखल झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून स्फोट झालेल्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. स्फोटानंतर पोलिसांनी एसएन बॅनर्जी रोडवरील वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
या स्फोटात बापी दास (वय-५८) नावाची महिला जखमी झाली आहे. दास यांना एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात देण्यात आले आहे. दास यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याचे समजते. दास या सफाई कर्मचारी असून त्या रस्त्यावरील चिंध्या गोळा करत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी प्लास्टिकची गोणी सापडली आहे. बीडीडीएस पथक दाखल झाले असून त्यांनी हा परिसर रिकामा केला आहे.