फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

एक हात मदतीचा: पूरग्रस्त 50 गावांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार!

एक हात मदतीचा: पूरग्रस्त 50 गावांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार!

– भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जपली मानवता
– समर्थक, पदाधिकारी यांच्या बैठकीत केला संकल्प
पिंपरी : मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अक्षरश: ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना ‘‘एक हात मदतीचा’’ देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील 50 पूरग्रस्त गावांतील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि कोकणातील चक्रीवादळ आपत्तीच्या काळात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘‘एक हात मदतीचा’’ मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आले. त्याचे महाराष्ट्रभरात कौतूक झाले होते.

आता मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यांमध्ये महापूर परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवडमधून पुन्हा एकदा मदतकार्य उभा करण्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विलास मडिगेरी, नितीन लांडगे, दक्षिण भारत मोर्चा प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजपा सरचिटणीस विकास डोळस, यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचाही पुढाकार…
‘एक हात मदतीचा’उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील 50 गावांमध्ये मदत एकाच दिवशी रवाना करण्याचे नियोजन आहे. दि.3 ते 11 ऑक्टोबर 2025 मदत संकलन, पॅकिंग आणि वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, गुरूवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सर्व मदतीच्या गाड्या रवाना होतील. दि. 10 व 11 रोजी पुरग्रस्त भागात मदत वितरण होईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ च्या आवारात मदत घेवून जाणाऱ्या गाड्यांचे पूजन होईल आणि मदत मराठवाड्याकडे पाठवण्यात येईल. याकामी हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट नियोजन कार्यात पुढाकार घेत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला. मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात महापुरामुळे शेतकरी-कष्टकरी यांचे अपार नुकसान झाले. शेवटच्या घटकापर्यंत मदतकार्य पोहोचवता यावे. याकरिता आम्ही पिंपरी-चिंचवडकरांच्या लोकसहभागातून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम हाती घेतला आहे. जीवनाश्यक वस्तुंचे वितरण, गोधन दान आणि त्यानंतर गरजुंना शैक्षणिक मदत अशी तीन टप्प्यांमध्ये मदतकार्य उभा करण्याचा संकल्प आहे. आपल्या योगदानामुळे किमान एका पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, अशा भावनेतून पिंपरी-चिंचवडकरांनी मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड,

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"