फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचा शानदार शुभारंभ!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचा शानदार शुभारंभ!
 शाहिरी जलसा, पारंपारीक हलगी वादन, गीतगायनाने उत्साहाचे वातावरण...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पाच दिवसीय भव्य ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन करण्यात आले आहे. निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात आज या पर्वाची सुरूवात महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी आमदार अमित गोरखे,माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे,सुमन पवळे,कमल घोलप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, माजी अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे,संदीपान झोंबाडे, नितीन घोलप,सुनिल भिसे, सतिश भवाळ,नाना कसबे, सुनिल भिसे,अरूण जोगदंड, संजय ससाणे, युवराज दाखले,आशाताई शहाणे,गणेश अवघडे, रामदास कांबळे,यादव खिलारे,बाळासाहेब खंदारे, महादेव आडागळे, बाळू पाटोळे, मयूर गायकवाड, शंकर खवले, लहू आडसूळ, नाथा शिंदे, सुरेश मिसाळ, शिवाजी चव्हाण, सचिन कसबे, साहेबराव थोरात,शिवाजी साळवे, आमदार अडसूळ, अविनाश शिंदे, आकाश रामनारायण. राजू आवळे, प्रसाद केसरे, मारुती सोनटक्के, सचिन पारवे, गोरख चौरे, प्रतिक सोनवणे, मीनाताई खिलारे, ज्योती वैरागळ, स्नेहा गायकवाड, राणी सोनवणे, मीरा आल्हाट, सविता आल्हाट, उषा आल्हाट, अंजली सोनवणे,आरती मिसाळ तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अभियंता मकरंद निकम,माजी नगरसदस्या सुमनताई पवळे,अनुराधा गोरखे,शर्मिला बाबर,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तू चव्हाण उपस्थित होते.

पारंपरिक वाद्यांच्या निनादाने वातावरण मंत्रमुग्ध....

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक सनई आणि हलगी वादनाने झाली. दत्तू चव्हाण यांचे सहका-यांनी सनई वादन आणि येडेश्वरी हलगी ग्रुपचे सागर यादव यांच्या हलगी वादनाने परिसरात पारंपरिक सांस्कृतिक उर्जा निर्माण झाली. त्यामुळे उपस्थितांना लोककलेच्या मूळ सौंदर्याची झलक अनुभवता आली.
स्वरांनी रंगली अण्णा भाऊंची चरित्रगाथा
‘स्वर चंदन’ अर्थात चंदन कांबळे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित स्फूर्तिदायक गीतगायन सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या आवाजात अण्णांच्या संघर्षमय प्रवासाचा सार भावून गेला.
शाहिरी जलशातून अण्णा भाऊंचे कार्यगौरव...
लोककलेचा ठसठशीत अविष्कार म्हणजे शाहीर बापू पवार यांचा ‘शाहिरी जलसा’. “लेखणीचा बादशाह” अशा बिरुदाने ओळखले जाणारे बापू पवार यांनी आपल्या जोशपूर्ण आवाजात अण्णा भाऊ साठेंच्या कार्याचा गौरव करणारी शाहिरी सादर करून फुले-शाहू-आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांच्यातील वैचारिक नात्यांची साखळी प्रभावीपणे गुंफली.

‘स्वरांश’ कार्यक्रमातून अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याची महती
कार्यक्रमात पुढे ‘स्वरांश’ या सांस्कृतिक गीतगायने शेखर साळवे आणि सहका-यांनी अण्णा भाऊ साठेंच्या परिवर्तनवादी आणि प्रखर साहित्याची झलक सादर केली. त्यांच्या सर्जनशीलतेचा सामाजिक परिणाम आणि आजही असलेली सामर्थ्यपूर्ण उपयुक्तता गाण्यांतून प्रकट झाली.
या पाच दिवसीय प्रबोधन पर्वामध्ये पुढील काही दिवसांत अण्णा भाऊ साठेंच्या विचारसरणीवर आधारित विविध व्याख्याने, काव्यवाचन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीरांच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या या पर्वाने सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक रंगात प्रेक्षकांना चिंतनशील ठेवलं आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"