कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराचा अपघातात जागीच मृत्यू!

पिंपरी : राजगुरुनगर येथे शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराचा जागीच मृत्यू झाला.. ही घटना पाबळ रोडवरील चव्हाण मळा टाकळकरवाडी फाटा परिसरात घडली. मृत पोलिस अंमलदाराचे नाव शशिकांत श्रीधर होले (वय 30, रा. होलेवाडी, ता. खेड) असे असून ते म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 28 मार्च रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शशिकांत होले हे बुलेट मोटरसायकल वरून आपल्या होलेवाडी येथील घरी जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या रिक्षाने अचानक वळण घेतल्याने बुलेट आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली .या भीषण धडकेत होले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले .त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शशिकांत होले हे धाडसी व कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

