ताथवडे गावाच्या विकासाची सातत्यपूर्ण परंपरा आणि भविष्यासाठी ठोस व्हिजन : राहुल कलाटे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती देण्याचा भाजपचा निर्धार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात ताथवडे गावठाण येथील नृसिंह मंदिर परिसरात नारळ फोडून पदयात्रा करण्यात आली. प्रचार पदयात्रा नृसिंह मंदिर, ताथवडे गावठाण येथून सुरू होऊन रघुनंदन कार्यालय, खांबेटे वस्ती, लोंढे वस्ती या मार्गे संपन्न झाली.

यावेळी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे, श्रुती राम वाकडकर, रेश्मा चेतन भुजबळ आणि कुणाल वाव्हळकर यांच्यासह राम वाकडकर, चेतन भुजबळ, संतोष पवार, बाळासाहेब सपकाळ, सुरेश पवार, अशोक पवार, सीताराम पवार, पाटीलबुवा पवार, अनिकेत नवले, भारती विनोदे, जयदीप पवार, नागेश पवार, लक्ष्मणराव मोहिते, मयूर पवार, संजय पवार, संतोष कदम, वसंतराव नवले, चंद्रकांत वाडकर, गणेश सपकाळ, जीवन नवले, निखिल नवले, जालिंदर फेंगसे, बाळासाहेब शिंदे (गुरव), पांडुरंग शिंदे, विजय वाघुळे, संदीप पारखी गिरीश दर्शले, देविदास पवार, राजेंद्र पवार, मारुती पवार, सोनवणे, जाधव, निकाळजे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार नाना नवलेंचा फोन
माजी खासदार नाना नवले म्हणजेच विदुरा यांच्याबद्दल सांगताना राहुल कलाटे भावूक झाले. नानांचे आणि आमचे मागच्या पिढ्यांपासूनचे हृदय संबंध राहिले आहेत. आजही त्यांचा फोन आला आणि त्यांनी मागील आठवणींना उजाळा देत “राहुल मी कायम तुझ्यासोबत आहे!” असे म्हणत आशीर्वाद दिले. जेष्ठांचे हे शब्द आणि नागरिकांची साथ मला संघर्ष करण्याचे बळ देतात, असे कलाटे म्हणाले.
ताथवडे परिसरात काम करतांना रस्त्यांच्या विकासाला गती आणि स्वच्छ व मुबलक पाणी या सुविधांना प्राधान्य देत प्रसंगी अंडर पास, सर्व्हिस रोडसाठी नागरिकांच्या बरोबरीने आंदोलनाची भूमिका घेऊन, कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून गाडा रस्ता, जीवन नगर ते एमटीयू रस्ता, शनी मंदिरापासून मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण तर अंडरपास मार्गे ताथवडे गावठाण ते पुनावळेपर्यंतच्या डीपी रस्त्याचे काम प्रगती पथावर असून या भागात २५ लाख लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी १० लाख लिटरच्या संपासह बसविण्यात आली आहे. – राहुल कलाटे, भाजप उमेदवार (प्रभाग क्रमांक २५)
ताथवडे, वाकड आणि पुनावळे गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा हेतू आहे. इथल्या ट्राफिक आणि इतर समस्यांना सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यानं उपरस्ते, एलिव्हेटेड रोड यासारख्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. भाजपला प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेला घेऊन सकारत्मकता आहे. – श्रुती राम वाकडकर, भाजप उमेदवार (प्रभाग क्रमांक २५)

