फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल!

गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल!

पिंपरी : गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 31 जानेवारी सव्वा सहाच्या सुमारास हिंजवडी फेज तीन मधील मोकळ्या जागेत करण्यात आली.

याप्रकरणी बांगो भमरू नट (वय 42, रा. क्रिसाला सोसायटी शेजारी, हिंजवडी ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा शाखा युनिट दोन मधील पोलीस अंमलदार रवी प्रकाश पवार पोलीस शिपाई यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगो भमरू नट यांच्याकडून 600 रुपये किमतीची सुमारे 67 लिटर गावठी दारू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसाकडून आरोपीस नोटीस देण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

दोन अल्पवयीन मुलांवर धारदार कटरने वार!
पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी दोन अल्पवयीन मुलांवर धारदार कटर ने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. ही घटना आळंदी येथील वडगाव रोड परिसरातील ज्ञानगंगा मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या स्वामी समर्थ लेडीज या दुकानासमोर घडली.

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन फिर्यादी मुलगा आणि त्याचा मित्र हे दोघेजण कार्यक्रम पाहून घराकडे चालले होते. त्यावेळी एका अल्पवयीन आरोपी मुलाने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाने कटरने फिर्यादी व त्याच्या मित्र यथार्थ रमेश रावल यांच्यावर हात पाय व कमरेवर वार केले. जखमेवर उपचार सुरू आहेत आळंदी पोलीस तपास करीत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"