…आणि पाच वर्षांनंतर बैलगाडा घाट झाला जिवंत !

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मराठी मातीतील खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्याला आपला महाराष्ट्रही अपवाद नाही. आज गावोगावी शहरीकरण झाले असले, तरीदेखील गावचे गावपण टिकवून ठेवण्यासाठी गावातील प्रतिष्ठित पुढारीमंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. हे प्रत्येक गावातच कमी-अधिक फरकाने होतच असते. गावातले सगळे सण-उत्सव आजही बदलत्या आणि धामधुमीच्या वातावरणात कसोशीने पाळण्याचा प्रयत्न या ग्रामस्थांचा असतो.
कृषिप्रधान संस्कृतीत प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात गावकऱ्यांना शेती असतेच. प्रत्येक शेतकऱ्याला शेतीकामासाठी बैलाची नितांत आवश्यकता असते. त्याचे सणदेखील शेती आणि बैल यांच्याच अनुषंगाने दिसतात. बैलपोळा हा सण जगात इतर कुठेही साजरा होताना दिसत नाही; मात्र महाराष्ट्रातील गावोगावी आजही तो साजरा होतो. या दिवशी शेतकरी बैलाला पुजतो, त्याला सजवतो, त्याची मिरवणूक काढतो. अशा या शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्वाच्या सणाबरोबरच गावची जत्रा हादेखील त्याचा आनंदाचा नि विसाव्याचा मोठा क्षण असतो. या आनंदसोहळ्यात तो सगळ्यांत उत्सवात सहभागी होत असतो. प्रत्येक गावात जे ग्रामदैवत असते, त्याची यात्रा होत असते. ती कधी गोडाची असते, तर कधी तिखटाची. या यात्रेत बैलगाड्यांच्या शर्यती, तमाशा, कुस्त्यांचा आखाडा, ढोल लेझीमचे खेळ आणि चक्रीभजन अशा गोष्टी कमी-अधिक फरकाने प्रत्येक गावात होतच असतात.
हवेली तालुक्यात बैलगाडा शर्यतीला शेतकरी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. काही वर्षे बैलगाडा शर्यतीवर बंदी होती; तर शेतकरी कासावीस झालेले दिसत होते. शेवटी त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही बंदी उठवण्यात त्यांना यश आले आणि पुन्हा एकदा पूर्वीच्या ताकदीने सर्व गावांमध्ये बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेत आजूबाजूची अनेक गावे गेली. त्या अर्थाने ही गावे उपनगर झाली, तरी त्यांनी आपली परंपरा सोडली नाही. चऱ्होली, भोसरी, मोशी या महानगरपालिकांच्या गावांमध्ये आजही बैलगाडा शर्यती होताना दिसतात, असे ‘थरार बैलगाडा शर्यतीचा, या लेखात इतिहास अभ्यासक व लेखक संदीप भानुदास तापकीर यांनी म्हटले होते. पूर्वीच्या काळात बैलगाड्यांची शर्यत ही घड्याळाच्या सेकंदावर नसायची. तेव्हा अंदाजे पहिले पाच नंबर काढले जायचे. त्यांना मानाचा फेटा दिला जायचा; मात्र १९९०-९१पासून सेकंदावर बैलगाडा शर्यत सुरू झाली. तसेच रोख रक्कम देणेही सुरू झाले. गेल्या दहा वर्षांपासून या शर्यतीला खूपच वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. शर्यतीमध्ये ४०० ते ५०० बैलगाडे येत असल्यामुळे ही शर्यत एक दिवसाऐवजी दोन दिवसांची करावी लागली. कधी कधी तिसरा दिवसही वापरावा लागत असतो.
या शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गाडामालक येतात. अत्यंत रंगतदार पद्धतीने ही शर्यत खेळली जाते. वाघेश्वराचा हा घाट पुणे जिल्ह्यात पहिल्या तीन क्रमांकामधील समजला जातो. येथील घाट १३ सेकंदांमध्ये फुटतो. गेली काही वर्षे गाडामालकांना मोठ्या प्रमाणात इनाम रोख रक्कम, तसेच अनेक बक्षिसे दिली जातात. त्यामुळे कायमच या शर्यतीत गाडामालक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच शर्यत पाहणारे उत्साही प्रेक्षकही उन्हाची तमा न बाळगता शेकडोंच्या संख्येने दोन-तीन दिवस घाटामध्ये बसून असतात. या शर्यती प्रत्यक्ष पाहणे अत्यंत रोमांचकारी असते. जो ही शर्यत पाहतो, तो कायमच या शर्यतीच्या प्रेमात पडतो. या तीन दिवसांच्या उत्सवात प्रत्येक घरात पाहुणेरावळ्यांना आवर्जून आमंत्रण दिले जाते. मित्रमंडळींना हक्काने बोलावले जाते. अशी ही शर्यत कधी येते, याची अनेक मंडळी चातकासारखी वाट पाहत असतात. त्याच बरोबर चिखली, मोशी, भोसरी, तळवडेतील बैलगाडा शर्यत पाहण्यासारखी असते.
महेशदादा, बैलगाडा मालकांचा सच्चा पाठीराखा !
शासनाची परवानगी न घेता पाटीलनगर – चिखली येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०२१ रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत दिलेल्या नियमानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आरोपींनी पालन केले नाही. लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकाNयांची परवानगी न घेता बैलगाडा शर्यत आयोजित केली. पाटीलनगर – चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात ही शर्यत घेतली होती. मात्र, बैलगाडा मालकांच्या पाठीशी महेशदादा उभा होता.
तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू!
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, यासाठी महेश लांडगे यांनी बैलगाडा मालकांच्या मदतीने न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवण्यास यश मिळवले. तसेच या मतदारसंघांमधील बैलगाडा मालक बैलगाडा मालक संघटनेला एकत्रित करून त्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत त्यांनी एक वर्षांपूर्वी चिखली येथे भरवली होती. त्यात साडेचार हजारहून अधिक बैलगाडे सहभागी झाले होते.
चिखलीत भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी ओळख निर्माण झालेल्या शर्यतीत पाच दिवसांत सुमारे ६ कोटी रुपयांची उलाढाल झाली. तसेच, सुमारे साडेचार लाख प्रेक्षक, बैलगाडा शौकींनांनी प्रत्यक्ष घाटात हजेरी लावली. विशेष म्हणजे, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे ५० ते ५५ लाख नेटिझन्सनी बैलगाडा शर्यतींचा लुटला, असे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे मोठ्या अभिमानाने सांगतात. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांच्या वतीने टाळगाव चिखली येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. जय हनुमान बैलगाडा मंडळाच्या वतीने शर्यंतीचे संयोजन करण्यात आले होते.
बैलगाडा शर्यतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
बैलगाडा शर्यतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शेतकºयांचा सेलिब्रेटीअसा बैलांचा उल्लेख बैलांचा सन्मान करण्यात आला. घाटावर सुमारे २० हजार बैलगाडा प्रेमी उपस्थित होते. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली.