फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचा मोठा वाटा

भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचा मोठा वाटा


चिंचवड : चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुढील २५ दिवस संघर्षाचे दिवस आहेत. आपला विजय निश्चितच आहे. त्यामुळे हा संघर्ष विजयासाठी नसून महाविजयासाठी करायचा आहे. शंकरभाऊंना दोन निवडणुकांच्या तुलनेत अधिक मताधिक्याने आमदार पदी निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल असा निर्धार, माथाडी व जनरल कामगार युनियनच्या हजारो सभासदांनी केला.

वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक कामगार युनियन महासंघाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला शहरातील जवळपास १३०० हुन अधिक सभासद उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
सध्या समाजातील तरुणांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे आणि वाममार्गाला लावण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र शंकरभाऊ आणि अनुप मोरे यांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत हजारो युवकांचे कुटुंब सावरण्याचे आणि आमची आर्थिक उन्नती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही कायम शंकरभाऊसोबत आहोत. व या निवडणुकीत एकजुटीने त्यांनाच आमदार करण्यासाठी काम करणार, अशी भावना युनियनच्या पदाधिकारी व सभासदांनी व्यक्त केली.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शेखर चिंचवडे, युवा मोर्चाच्या सचिव तेजस्विनी कदम, माथाडी युनियनचे बाबू भोंडवे, प्रवीण यादव, इम्रान पानसरे, ऋत्विक कुटे, अजय थोरात, रोहन पवार, महेश पवार, सागर वाघमोडे, बबलू जोगदंड, विकी भिसे, गोट्या शर्मा, अमर गावडे, आकाश रणदिवे यांच्यासह भारतीय जनता माथाडी आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील युवकांच्या रोजगारासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. भारतीय जनता युवा मोर्चा असो की माथाडी व सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन असो शंकरभाऊ नेहमी आमच्या सहकार्यासाठी तत्पर असतात. हीच तत्परता आता आम्ही व आमचे हजारो सदस्य या चिंचवड विधानसभा निवडणुकीत दाखविणार असून यावेळी किमान एक लाख मताधिक्याचा टप्पा ओलांडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शंकरभाऊंना आमदार करण्याचे आमचे स्वप्न असून ते स्वप्न २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"