फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

“निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत”

“निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत”

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : चिंचवड विधानसभेसाठी प्रचाराचा धडाका सुरू करत महायुतीचे शंकर जगताप यांनी आज वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडे नगर गावभेट दौरा केला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुजरात राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जी जडेजा यांची विशेष उपस्थिती होती. ” तु्म्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत,” अशी भावनी नागरिकांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले. “तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपला विजय विक्रमी मताधिक्यानेच होणार, असा शब्द यावेळी तिन्ही गावातील ग्रामस्थांनी दिला. संकल्प विजयाचा, शाश्वत विकासाचा, चिंचवड विधानसभेच्या चौफेर प्रगतीचा…! अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला.

ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले. या गावभेट दौऱ्यानिमित्त शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री.भगवान वाल्हेकर, माजी सत्तारूढ पक्षनेते श्री.शामराव वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्री.श्रीधर वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती श्री.नाना शिवले, माजी नगरसेवक श्री.माऊली सूर्यवंशी, श्री.शेखर चिंचवडे, भाजपा उपाध्यक्ष श्री.सुधीर आबा वाल्हेकर सौ.मोनाताई कुलकर्णी, श्री.आबा सोनवणे, श्री.रवींद्र वाल्हेकर, श्री.निखिल वाल्हेकर, श्री.अशोक शिवले, श्री.अनिल चिंचवडे, श्री.बाबाजी चिंचवडे, श्री.सागर चिंचवडे, श्री.अशोक भालके, श्री.आनंदा चिंचवडे, सौ.पल्लवीताई वाल्हेकर, श्री.अशोक वाल्हेकर, श्री.पोपट शिवले, श्री.दिलीप साठे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते, सरचिटणीस, भाजपा पिं.चिं.शहर श्री.नामदेव ढाके, माजी उपमहापौर श्री.सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक श्री.प्रमोद कुटे, माजी स्वीकृत सदस्य श्री.बिभीषण चौधरी, सौ.कविता दळवी, सौ.पल्लवी वाल्हेकर, सौ.पल्लवी मारकड, श्री.सुधीर चिंचवडे, श्री.मनोज तोरडमल, श्री.युवराज वाल्हेकर, श्री.निखिल वाल्हेकर, श्री.सोमनाथ वाल्हेकर, श्री.शैलेश वाल्हेकर, श्री.वाल्मिक शिवले, श्री.सचिन शिवले, श्री.गौरव शिवले, श्री.संदीप शिवले, सौ.रेणुका आनंदपुरे, श्री.अनिकेत दळवी, श्री.प्रदीप पटेल, श्री.भगवान निकम, श्री.बिरमल चौबे, श्री.शिवाजी आवारे, सौ.कीर्ती परदेशी यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"