फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड शिक्षण

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासात शिक्षकांचा मोलाचा वाटा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण तसेच गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नवीन संकल्पना आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी देखील ते सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात ही बाब कौतुकास्पद आहे. यापुढे देखील महापालिका शाळा आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीचा आलेख अधिकाधिक वाढविण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज असून निरंतर प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. तेव्हा ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, माध्यमिक प्रशासन अधिकारी राजीव घुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी बुधा नाडेकर तसेच विविध शाळांमधील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षक उपस्थित होते

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, भारत देशात गुरु आणि शिष्य परंपरेमध्ये गुरुंना महत्त्वपूर्ण दर्जा दिला जातो. गुरु आणि शिष्याचे नाते खूप पवित्र मानले जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते कालानुरूप बदलत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत असतात. विद्यार्थ्यांना घडविण्याचे अवघड कार्य शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वजण उत्तम सहकार्य करत असतात. यामध्ये पालकांचा देखील सहभाग वाढविणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या काही शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्वाची असून याकडे देखील सर्वांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका देखील आवश्यक कार्यवाही करत आहे. विद्यार्थ्यांमधील कमतरता भरून काढण्यासाठी सर्वांनी सांघिक भावनेने काम करणे आवश्यक आहे, असे देखील आयुक्त सिंह म्हणाले. आदर्श शिक्षकांचे आयुक्त सिंह यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.
पिंपरी, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण तसेच गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नवीन संकल्पना आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी देखील ते सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात ही बाब कौतुकास्पद आहे. यापुढे देखील महापालिका शाळा आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीचा आलेख अधिकाधिक वाढविण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज असून निरंतर प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. तेव्हा ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, माध्यमिक प्रशासन अधिकारी राजीव घुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी बुधा नाडेकर तसेच विविध शाळांमधील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षक उपस्थित होते

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, भारत देशात गुरु आणि शिष्य परंपरेमध्ये गुरुंना महत्त्वपूर्ण दर्जा दिला जातो. गुरु आणि शिष्याचे नाते खूप पवित्र मानले जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते कालानुरूप बदलत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत असतात. विद्यार्थ्यांना घडविण्याचे अवघड कार्य शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वजण उत्तम सहकार्य करत असतात. यामध्ये पालकांचा देखील सहभाग वाढविणे गरजेचे आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"