एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे.
आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होत आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जावी, अशी मागणी करत हे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करीत आहेत. आयोगाने या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही या प्रकरणाची दखल घेतली होती. परीक्षा पुढे न ढकलल्यास मी स्वतः आंदोलनात सहभागी होईन, असा इशारा त्यांनी दिला होता.