फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

घराचा दरवाजा उघडा पाहून ८९ हजारच्या वस्तूंची चोरी

घराचा दरवाजा उघडा पाहून ८९ हजारच्या वस्तूंची चोरी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : घराचा दरवाजा उघडा राहिलेला पाहून भर दिवसा अज्ञात चोरट्याने त्या घरातून रोख रकमेसह ८९ हजारच्या वस्तू चोरून नेल्याची घटना अशोकनगर ताथवडे येथे घडली आहे.

या प्रकरणी विश्वदीप विश्वनाथ गाढवे (वय २४, रा. अशोकनगर, ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वदीप हे त्यांच्या खोलीत झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरातून ४० हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, २०० रुपये किमतीचे पाकीट, २५ हजार रुपये रोख रक्कम, २० हजार रुपये किमतीचे ॲपल कंपनीचे इयर पॉड, ४०० रुपये किमतीची पावर बॅंक असा एकूण ८९ हजार २०० रुपये यांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलिस तपास करीत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"