फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पर्यावरण पिंपरी-चिंचवड

नागरी सहभागासह हरित सेतू प्रकल्प

नागरी सहभागासह हरित सेतू प्रकल्प

मुद्द्याचं बोला न्यूज नेटवर्क
पिंपरी : हरित सेतू हा प्रकल्प म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पादचारी, विद्यार्थी, सायकलप्रेमी या सगळ्यांना उत्साहवर्धक वातावरण वाटेल, अशी योजना आहे. नागरी सहभाग, नाविन्यता यांचा मेळ घालून प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.

निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील मनोहर दत्तात्रय वाढोकर सभागृहात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हरित सेतू विषयक कार्यशाळेत ते बोलत होते. मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार, गिरीश गुठे, स्मार्ट सिटी आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”हरित सेतू हा महापालिकेचा एक महत्वाकांक्षी सायकलस्नेही व पादचारी सुविधांसह सुरक्षितता पुरविणारा प्रकल्प आहे ज्याचा जागतिक पातळीवर उल्लेख झालेला आहे. ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरस्काराने महापालिकेला जागतिक पातळीवर सन्मानित केले आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्व रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत मिळत आहे. शहरातील रहदारी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित असताना नागरिकांचा प्रतिसाद तसेच त्यांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.’

कार्यशाळेच्या सुरूवातीस वास्तुविशारद प्रसन्न देसाई यांनी नागरिकांना प्रस्तावित रस्ते व रचनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. त्यानंतर एक संवादात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"