शिवाजी लांडगे यांचे निधन

पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी येथील शिवाजी गेणू लांडगे (६४) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लांडगे लिंबाची तालीम मंडळाचे ते सल्लागार होते. बांधकाम व्यावसायिक किरण लांडगे यांचे ते वडील होत.