फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

सोपान पूल पाण्याखाली

सोपान पूल पाण्याखाली

पिंपरी, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आळंदी येथील भक्ती सोपान पूल कालपासून (दोन ॲागस्ट)।पाण्याखाली आहे.

इंद्रायणी नदीकाठचा दगडी घाट बऱ्यापैकी पाण्याखाली गेला असून नदी शेजारील भक्त पुंडलिक मंदिरचा काही भाग व दगडी घाट परिसर नदी पात्राच्या पाण्याखाली गेला आहे. सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदीपात्रात जात आहे. गेल्या २५ जुलै रोजी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पूरानंतर नदी पात्रातील पाणी हळूहळू ओसरले होते. परंतु, कालपासून इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसून येत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"