नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलवर लागली पैज!

पॅरिस : भारताचा ॲथलिट नीरज चोप्रा याच्या कामगिरीकडे पूर्ण जगाचं लक्ष आहे. मागच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्यानंतर जवळपास प्रत्येक सामन्यात त्यानं सुवर्णपदक भारताकडे आणलं आहे. विश्वविजेत्या स्पर्धेतही त्यानं सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आता पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ मध्ये जर त्याने सुवर्णपदक मिळवलं तर भारतीयांना परदेशात जाण्याचा व्हिसा मोफत दिला जाईल, अशी पैज अमेरिकेतल्या एका उद्योजकानं लावली आहे.
मोहन नाहटा असं या उद्योजकाचं नाव आहे. आहे. ते अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्को या ठिकाणी कार्यरत असलेल्या एटलिस या कंपनीचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. एटलिस हा एक ऑनलाईन व्हिसा ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे. दरम्यान मोहन नाहटा यांनी लिंक्डइनवर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. “जर नीरच चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं तर मी सर्वाना फ्रीमध्ये व्हिसा मिळवून देईन. चला तर मग गोल्ड मेडलचं सेलिब्रेशन करूया.” अशा आशयाचा मजकूर या पोस्टमध्ये त्यांनी लिहिला आहे.
सध्या जगभरातील खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करताना दिसत आहेत. गेली ४ वर्ष या खेळाडूंनी जो काही कसून सराव केला आहे, या खेळाडूंच्या कुटुंबीयांनी जो काही त्याग केलाय त्याची परिणीती या ऑलिम्पिक पाहायला मिळतेय. असो, पण याच पार्श्वभूमीवर एका भारतीय उद्योजकाची लिंकडीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण या उद्योजकानं दावा केलाय की, जर नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं तर तो भारतीयांना विदेशात जाण्यासाठी फ्रीमध्ये व्हिसा मिळवून देईल. पण प्रश्न असा आहे, हा उद्योजक आहे तरी कोण?
उद्योजक मोहन नाहटा म्हणतात की, ज्या दिवशी नीरज चोप्रा सामना जिंकेल त्या दिवसासाठी ही ऑफर असेल. त्यासाठी आम्ही कुठलाही चार्ज घेणार नाही. पण ही ऑफर खास करून भारतीय लोकांसाठी आहे. भारतीयांना कोणत्याही देशात जायचे असेल तर फक्त या एका दिवशी बुकिंग केल्यास व्हिसाची रक्कम आकारली जाणार नाही. पण जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशाचे नागरीक असाल तरी देखील आम्ही तुमचा नक्की विचार करू.