फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड शहर समाजकारण

सेवानिवृत्तांनी आनंदी जीवन जगावे- इंदलकर

सेवानिवृत्तांनी  आनंदी जीवन जगावे- इंदलकर

पिंपरी ): सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी जबाबदारीने, प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या उत्कृष्ठ कामकाजाचा परिचय दिला आहे. असे सांगून अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सेवानिवृत्तांना उत्तम आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

माहे जुलै २०२४ अखेर वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २८ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या २ अशा एकूण ३० कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, उपआयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारुशीला जोशी, कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, नथा मातेरे, बालाजी अय्यंगार, रमेश लोंढे, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे जुलै २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये मुख्य अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता विलास देसले, लेखाधिकारी राजू जठार, उप आभियंता सुभाष काळे, कार्यालय अधिक्षक अनिता मालपाठक, निळकंठ काची, मुख्याध्यापिका संगीता टिळेकर, भारती थिटे, सुनिता राऊत, भारती विभांडिक, लिलावती कांबळे, लेखापाल ज्ञानेश्वर सोमवंशी, मुख्य लिपिक राजू काळभोर, सिस्टर इनचार्ज प्रमिला बडीगेर, फार्मासिस्ट शाम चव्हाण, कनिष्ठ अभियंता सुधाकर चव्हाण, कॉम्प्युटर ऑपरेटर रेवती अडूरकर, वायरमन निसार शेख, दशरथ राणे, वायरलेस ऑपरेटर संजय कांबळे, मजूर दिपक जवळकर, विनोद ताडीलकर, सुरेश हगवणे, नंदकुमार कलाटे, अशोक कदम, बबन जिते, आया अलका भेगडे, सफाई सेवक उत्तम माने यांचा समावेश आहे तर कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उप शिक्षिका मंजिरी डेंगळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"