तुमच्या मुलांना हे ५ पदार्थ खाऊ घालता का?

प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की त्यांच्या मुलांची देहयष्टी उत्तम असावी. पण, काही काही मुलांची उंची नैसर्गिकपणे वेगानं वाढत असते, पण काही मुलांची उंची एकतर हळू वाढते किंवा काही मुलं बुटकीच राहतात. याला अनेक कारणं असू शकतात. मुलांच्या पूर्ण पोषणासाठी कोणते पदार्थ खायला दिले पाहिजेत, ते जाणून घेऊ या.
मुलांचा शारीरिक विकास, त्यांची उंची ही जनुकांवर अवलंबून असते. जर आई-वडिलांची उंची चांगली असेल तर मुलं सुद्धा उंच होणं स्वाभाविक आहे. मात्र, कित्येक वेळा असंही होत नाही. त्यामुळेच जनुकांबरोबरच उत्तम आहार न मिळणं हे सुद्धा होऊ शकतं. कारण, मुलांच्या शरीराच्या वाढीसाठी योग्य पोषणतत्त्वांची गरज असते. मुलांच्या शरीरात पोषण तत्त्व कमी असल्यास त्यांच्या वाढीबरोबरच हाडांमध्ये सुद्धा कमकुवतपणा येऊ शकतो. मग अशा वेळी मुलांच्या आहारामध्ये पौष्टिक अन्नघटकांचा समावेश केला गेला पाहिजे.
१. सुका मेवा : खरं तर, बदाम, बेदाणे, पिस्ता, काजू आणि अक्रोड यासारख्या सुका मेवा असलेल्या पदार्थांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण पोषकतत्त्व आढळतात. आहारतज्ज्ञांच्या मते, मुलांचं शरीर कणखर होण्यासाठी सुका मेवा अधिक उपयुक्त मानला जातो. ज्यामुळे मुलांची हाडं मजबूद होण्यास आणि शरीरात स्नायू बळकटीसाठी मदत होते.

२. हिरव्या पालेभाज्या : ऋतूनुसार मिळणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. मुलांच्या उत्तम वाढीसाठी हिरव्या पालेभाज्या सुद्धा उपयुक्त असतात. कारण, ऋतूनुसार बाजारात मिळणाऱ्या भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्व असतात. ज्यामुळे शरीराला खूप फायदा होत असतो.
३. मोसमातली फळं : जर तुमच्या मुलांची उंची वाढत नसेल तर त्यांना पोषणतत्त्व असलेल्या विविध गोष्टी आहारात खायला देणं सुरू करा. यासाठी त्यांच्या आहारात तुम्ही प्रत्येक मोसमात मिळणाऱ्या फळांचा समावेश करू शकता. खरं तर, फळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वं आणि अन्य पोषकतत्त्व मिळत असतात, जी मुलांच्या वेगानं वाढीसाठी खूप उपयुक्त ठरत असतात.

४. डेअरी उत्पादनं : आहारतज्ज्ञ रोहित यादव यांच्या मते, मुलांच्या उत्तम वाढीसाठी त्यांची हाडं मजबूत होणं खूप आवश्यक आहे. यासाठी मुलांच्या आहारात तुम्ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करू शकता. खरं तर दुधामध्ये कॅल्शिअमसह अनेक खनिजं आणि जीवनसत्त्व असतात, जी हाडं मजबूत करण्याबरोबरच वेगानं वाढीसाठी मदत करतात.
५. बिया : मुलांच्या वाढीसाठी बिया सुद्धा खूप उपयुक्त असतात. महत्त्वाचं असं की, बियांमध्ये आढळणारी सगळी पोषकतत्त्व सर्व प्रकारे परिणामकारक असतात. या बिया मुलांच्या आहारात समाविष्ट केल्यामुळं त्यांच्या आहारात वाढ होते. त्या बरोबरच, हाडं सुद्धा मजबूत होतात. त्यासाठी चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स (अंबाडीच्या बिया) आणि तीळ आदींचा आहारात समावेश करू शकता.