लाखोंच्या नफ्याचे अमिष दाखवून फसवणूक!

पिंपरी : बिझनेस लेव्हल प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 एप्रिल ते 10 जून या कालावधीत कासारवाडी येथील गेरा बिल्डिंग मधील कार्यालयात घडली.
याप्रकरणी राजेंद्र आनंदराव पाटील (वय 51, रा. पिंपरी गाव) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नारायण अर्जुन नागरगोजे (रा. कासारवाडी, मूळ- रा. गेवराई, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीला ‘प्रॉफिट पॉईंट’ नावाच्या व्यवसायातील लेव्हल प्लॅनची माहिती दिली. या योजनेत कमी पैसे गुंतविल्यास लाखोचा फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादीने पैसे गुंतवले मात्र अपेक्षित परतावा न मिळाल्याने त्यांनी रक्कम परत मागितली. त्यावेळी आरोपीने टाळाटाळ करून फसवणूक केली दापोडी पोलीस तपास करीत आहेत.
दरवाज्याला लटकवलेल्या चावीने दार उघडून चोरी!
पिंपरी : घराच्या सेफ्टी डोअरच्या आतील बाजूला लटकवलेली चावी वापरून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि 4 लाख 45 हजार 400 रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी अडीचच्या दरम्यान पिंपळे निलख येथील विनायकनगर परिसरात घडली.
याप्रकरणी ऋषिकेश एकनाथ गायकवाड (वय 27, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत..

