Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

28th October 2026
गुन्हेगारी

भोसरीतील खून प्रकरणी दोन आरोपी व तीन अल्पवयीन मुलांना अटक!

भोसरीतील खून प्रकरणी दोन आरोपी व तीन अल्पवयीन मुलांना अटक!

पिंपरी : भोसरी देवकर वस्ती येथील प्रोटेक्ट कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत 3 ऑक्टोबर रोजी अतुल तानाजी रघतवान यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. भोसरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी मयताचा आतेभाऊ करण उर्फ गणेश तानाजी करवंदे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळावरील माहिती उपलब्ध करुन तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्कार सिंग सतनाम सिंग भोंड (वय 36, रा. चक्रपाणि वसाहत, भोसरी), पवन धनंजय गुप्ता (वय 18, वर्षे पाच महिने, देवकर वस्ती. भोसरी व तीन अल्पवयीन मुलांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे.

indra dairy
indra dairy

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्याबाबत व इतर सहभागी व्यक्तींबाबत तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास नाथा घारगे पोलीस निरीक्षक, गुन्हे भोसरी पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, संदीप घोरपडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाथा घारगे पोलीस निरीक्षक गुन्हे ,भोसरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ टापरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे, सहाय्यक पोलीस फौजदार बोयने व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"