देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगले: एकास अटक!

पिंपरी : विनापरवाना ,बेकायदेशीर रित्या आदेशाचे उल्लंघन करून एका तरुणाने देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला. शिवाय शहरात घातक शस्त्र वापरण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचे उल्लंघन केल्याने तरुणास अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवार सहा ऑक्टोबर रोजी साडेतीन वाजण्याचे सुमारास मौजे वाकी खुर्द, ता. खेड गावचे हद्दीत स्मशानभूमी जवळ पुणे – नाशिक रोडवर करण्यात आली.

याप्रकरणी सुधीर शिवाजी दांगट पोलीस अंमलदार, गुन्हे शाखा युनिट तीन यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण रमेश इचके (वय 24, रा. कवठेयमाई, ता. शिरूर) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. याशिवाय इचके याने महबूब मकबूल नदाफ (रा. वाकी खुर्द) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने विनापरवाना बेकायदेशीररित्या एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे असा एकूण 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचा भंग करण्यात आला. सदर घातक शस्त्र आरोपी एक याने मेहबूब मकबूल नदाफ यांच्याकडून खरेदी केले असल्याचे आरोपीने सांगितले. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनुभुले, पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे हे तपास करत आहेत.

