रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत टोळीला केले जेरबंद!

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन पथकाची कारवाई
पिंपरी : रिक्षा चालक आणि त्याचे दोन साथीदार यांनी एका व्यक्तीस कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी करून 11470 रुपये रोख रक्कम काढून घेतली. ही घटना 28 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास एमएआरजे टेक्नो लास्ट कंपनी समोर, निघोजे- तळवडे ब्रिज रोडवर, निघोजे ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी अजय चिंतामण देसले- पाटील (वय 29) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमन उर्फ शहाबाज समीर शेख (वय 26), शेखर बापू माने (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक एक अमन उर्फ शहाबाज समीर शेख हा निगडी पोलीस स्टेशन कडील मोक्का गुन्ह्यातून पंधरा दिवसापूर्वी जामीनावर जेलमधून बाहेर आला होता. शेखर बापू माने या आरोपीवर जबरी चोरी व मारहाण असे गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्यासाठी वरिष्ठांनी तात्काळ वेगवेगळी तपास पथके तयार करून शोध घेण्याकरता रवाना करण्यात आली. तपास पथकाने सीसीटीव्हीचे तांत्रिक विश्लेषण करून रिक्षाचा क्रमांक प्राप्त करून आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक करण्यात आली. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ यांचे समक्ष हजर करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ चारच्या श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, प्रवीण वांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे, राजकुमार हनुमंते यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी हे करत आहेत.

