Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

बीट निरीक्षकांच्या दर तीन महिन्याला बदल्या करण्याचा निर्णय!

बीट निरीक्षकांच्या दर तीन महिन्याला बदल्या करण्याचा निर्णय!

पिंपरी : अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाईची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची (बीट निरीक्षक) यांची एका ठिकाणी दीर्घकाळ नेमणूक न ठेवता दर तीन महिन्यांनी त्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत असे आदेश आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

viara vcc
viara vcc

महापालिका स्थापत्य विभागाचे बीट निरीक्षक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शहरातील अनाधिकृत बांधकामे, रस्त्यालगतच्या टपऱ्या आणि इतर अतिक्रमणे सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्याची जबाबदारी बीटनिरीक्षकांवर आहे. संबंधित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन कारवाई साठी पाठपुरावा करणेही त्यांच्याकडून अपेक्षित असते. मात्र ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे करीत नाहीत. काही बीटनिरीक्षक लाच म्हणून रक्कम स्वीकारताना रंगीहात पकडले गेले आहेत.

indra dairy
indra dairy

एकाच परिसरात दीर्घकाळ नियुक्ती असलेल्या बीटनिरीक्षकांकडून जाणून-बुजून बांधकामे किंवा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरात अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणात वाढ झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल होत आहेत. महापालिका सभागृहात नगरसेवकांनीही यावर आवाज उठवला त्याची दखल घेऊन आयुक्त सूर्यवंशी यांनी सर्व बीटनिरीक्षकांची दर तीन महिन्यांनी बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"