Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
गुन्हेगारी

जमीन डेव्हलपमेंट एग्रीमेंट करण्यास विलंब; आर्किटेकचे अपहरण करून मारहाण!

जमीन डेव्हलपमेंट एग्रीमेंट करण्यास विलंब; आर्किटेकचे अपहरण करून मारहाण!

पिंपरी  : जमीन डेव्हलपमेंट एग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून आर्किटेकचे कारमधून अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्याच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्याचा प्रकार रावेत ते विश्रांतवाडी दरम्यान घडला.

याप्रकरणी सुरज नाथाजी पाटील (वय 31, रावेत, मूळ- पन्हाळा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाकांत तिवारी (रा.किवळे), मुस्सा गौस शेख (रा. देहूरोड) आणि तिवारी यांच्या कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्सा शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किवळे येथील जमीन विकसित करण्यासाठी आरोपी आणि जागामालक यांच्यात डेव्हलपमेंट एग्रीमेंटचे काम फिर्यादीच्या मध्यस्थीने सुरू होते. त्यास विलंब होत असल्याने मंगळवार 22 सप्टेंबर दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादीला रावेत तेथील ‘कन्नु की चाय’ रेस्टॉरंट जवळ बोलवण्यात आले. तेथे दमदाटी करून त्याला टोयाटो हायरायडर कार मध्ये बळजबरीने बसवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एचडीएफसी बँकेच्या कोऱ्या चेक वर सह्या घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास विश्रांतवाडी येथे सोडण्यात आले. रावेत पोलीस तपास करत आहे.

indra dairy
indra dairy

साडी खरेदी करण्याच्या नादात 1 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक!
पिंपरी : इंस्टाग्रामवर पाहिलेल्या साडीची किंमत आणि त्यानंतर जीएसटी सह वेगवेगळी कारणे सांगून सायबर भामट्याने तरुणी कडून तब्बल 1 लाख 19 हजार दोनशे नऊ रुपये उकळले.

याप्रकरणी माण- हिंजवडी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात इंस्टाग्राम आयडीधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी instagram वर रिल्स पाहत असताना तिला ‘मनीष मॅन्युफॅक्चर’ नावाच्या कपड्यांच्या दुकानाची साडी आवडली. जाहिरातीतील व्हाॅट्सॲप क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपीने सुरुवातीला साडीचे पैसे आणि नंतर जीएसटी व अन्य कारणे सांगून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. मात्र साडी न पाठवता एकूण एक लाख एकोणीस हजार दोनशे नऊ रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत. साडी खरेदी करण्याच्या नादात 1 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक!

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"