Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील तीन पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील तीन पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील तीन पोलीस उपनिरीक्षक आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार व निरोप समारंभ आज 30 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील “शिवनेरी हॉल ” येथे संपन्न झाला

viara vcc
viara vcc

नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये रवींद्र सदाशिव आहेरराव पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग, संजय व्यंकटेश कामटे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग, लक्ष्मण सहादू बोर्डे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय यांचा समावेश आहे.

indra dairy
indra dairy

आयोजित कार्यक्रमात पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उप आयुक्त मुख्यालय गणेश इंगळे यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र,ओळखपत्र, शुभेच्छापत्र ,स्मृतीचिन्ह, झाडाचे रोपटे व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्य व आरोग्या करिता शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड (कल्याण शाखा), सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे (कल्याण शाखा) तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार आणि त्यांचे नातेवाईक पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"