डीपी मधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱी टोळी जेरबंद!

10 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : ग्रामीण भागामध्ये शेतीपंपासाठी उभारलेल्या महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून एक ईरटीका कारसह 10 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाच्या कारवाईमुळे चार गुन्हे उघड झाले आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शहा (वय 28, रा. कुदळवाडी, बालघरे वस्ती, भैरवनाथ मंदिराजवळ चिखली, मूळ- रा. दुधियाना ब्रुजूक, ठाण ढोबरूया, तहसील सौरदगड, जि. सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश), मैनुद्दीन खलील शहा (वय 35, रा. कुदळवाडी बालघरे वस्ती भैरवनाथ मंदिराजवळ चिखली, मूळ- रा. ग्राम. कलीचर सम्राट बनकशिया, ठाणा. डुमरीयागंज, तहसील डुमरीयागंज, जि. सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश), सुफियान जमीरुल्ला खान (वय 19, रा. दुधीयाना बुजुर्ग, पोस्ट बरंहनी, तहसील सोहरतगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई 26 सप्टेंबर रोजी देहूरोड फूड प्लाझा येथे एका पांढऱ्या रंगाच्या ईरटीगा कार मधून तांब्याच्या तारा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपींना जेरबंद केले.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे चोरीचा माल विक्रीसाठी घेऊन जाणार असले बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
चाकण परिसरामध्ये शेतीपंपासाठी उभारलेल्या महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तपासाचे आदेश दिले होते. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याबाबत माहिती देऊन गोपनीय बातमीच्या आधारे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही कारवाई 26 सप्टेंबर रोजी देहूरोड फूड प्लाझा येथे एका पांढऱ्या रंगाच्या ईरटीगा कार मधून तांब्याच्या तारा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपींना जेरबंद केले. यामुळे दक्षिण चाकण व उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हे उघड झाले आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उंब्रजकर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, विशाल गायकवाड व अन्य साथीदाराच्या पथकाने केली आहे.

