Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

बिझनेस पार्टनर असल्याचे भासवून 30 लाखाचा गंडा!

बिझनेस पार्टनर असल्याचे भासवून 30 लाखाचा गंडा!

पिंपरी : बिझनेस पार्टनर बोलत असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला व्हाट्सॲप वर संदेश पाठवत कंपनीच्या बँक खात्यातून तीस लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून घेत फसवणूक करण्यात आली. बुधवार 23 सप्टेंबर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी दिलीप प्रल्हाद चौहान (वय 42, बावधन बुद्रुक) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीच्या मोबाईल मध्ये विनापरवानगी प्रवेश करून व्हाट्सॲपवर त्याचा बिझनेस पार्टनर असल्याचे भासवले. विश्वास संपादन केल्यानंतर कंपनीच्या बँक खात्यातून तीस लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. रक्कम पाठविल्यानंतर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक शिकलगार तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

रात्री रस्त्यात अडवून तरुणाला लुटले!
पिंपरी : रात्रीचे जेवण करून घरी परतणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवून पैशाची मागणी करत मारहाण व दमदाटी करून त्याच्या खिशातील तीन हजार दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना भोसरी येथे घडली. मंगळवार 22 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सहल केंद्रासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.

याप्रकरणी दिपेंद्र बदाम सिंह राजपूत (वय 30, लांडेवाडी चौक, भोसरी, मूळ- रा. दमोहा, मध्य प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. आदेश ज्योतीराम सुरवसे (वय 19, रा. संततुकाराम नगर, भोसरी, मूळ- रा. निलंगा, लातूर )आणि एका 20 ते 24 वर्ष वयाच्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश सुरवसे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जेवण करून झोपण्यासाठी घरी जात असताना दोघांनी त्याला अडवून पैशाची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी दमदाटी करून फिर्यादीचे दोन्ही हात पकडले. तर दुसऱ्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातील तीन हजार दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोघे अंधाराचा फायदा घेऊन निघून गेले. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दगडगावे , सहा पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"