Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्टच्या भीतीने फसवणूक!

निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्टच्या भीतीने फसवणूक!

पिंपरी : ‘ईडी’ चे अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल आरेस्टची भीती दाखवत 85 वर्षीय निवृत्त आर्मी अधिकाऱ्याकडून बारा लाख रुपये लाटण्यात आले. हा प्रकार एक ते पाच सप्टेंबर या कालावधीत रुपीनगर (तळवडे) येथे घडला.

viara vcc
viara vcc

रामकृष्ण ज्ञान शिंदे (वय 85, रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विविध व्हाट्सॲप क्रमांक धारक आणि एका खाजगी कंपनीच्या बँक खात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपींनी फिर्यादीला व्हाट्सॲप व्हिडिओ कॉल करून आपण सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगितले. डिजिटल आरेस्टची भीती दाखवून त्यांना एका खाजगी बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले. अशाप्रकारे एकूण बारा लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख, पोलीस निरीक्षक फडतरे तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

दुप्पट परताव्याचे आमिष 16 लाख42 हजाराची फसवणूक!
पिंपरी : शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका तरुणाची 16 लाख 42 हजार पाचशे रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दोन ऑगस्ट 2023 ते 27 मे 2024 या कालावधीत बिजलीनगर चिंचवड येथे घडला.

रामकृष्ण पाटील (वय 24, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल चंदू पाटील, गौरव चंदू पाटील आणि एक महिला (सर्व रा. शिरपूर, जि. धुळे) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीला ‘गुरु ट्रेड 7’ नावाच्या ॲपद्वारे शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला गुंतवणुकीत तोटा झाल्याचे सांगून अधिक पैसे भरल्यास दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर नफ्याची रक्कम काढण्यासाठी विविध कारणे देत फिर्यादी कडून एकूण 16 लाख 42 हजार पाचशे रुपये ऑनलाईन घेतले आणि ते पैसे स्वतःसाठी वापरून फसवणूक केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बळीप तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"