एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू!

पिंपरी : एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 57 वर्षीय दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. भारत माता चौक मोशी येथे मंगळवार 22 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अरुण बाजीराव कुंभार (वय 57, रा.मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी सुभाष बाजीराव कुंभार वय 54 यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एसटी बस चालक संजय गजानन कोंढुरकर (वय 42, रा. सिन्नर, जि. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे भाऊ अरुण कुंभार हे त्यांच्या दुचाकीवरून चिखली कडून मोशी कडे जात होते. त्यावेळी चाकण कडून येणाऱ्या एसटी बसच्या चालकाने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून निष्काळजीपणे बस चालवत दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अरुण कुंभार यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

दुचाकीस्वराचा पादचारी मार्ग आणि झाडाला धडक दिल्याने मृत्यू!
पिंपरी : भरधाव दुचाकी पादचारी मार्गाला आणि त्यानंतर झाडाला धडकल्याने चालकाचा मृत्यू झाला. स्पाईन रोडवर जग्वार कंपनीच्या पुढे 28 जुलैच्या रात्री हा अपघात घडला. प्रफुल्ल दिवाकर चांदूरकर (वय 38, रा. तळवडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय बाबुराव देवकुळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल चांदुरकर हे त्यांच्या दुचाकीवरून स्पाईन चौक ते चिखलीकडे जाणाऱ्या सर्विस रोडने जात होते. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव दुचाकी चालवल्याने ती रस्त्याच्या पादचारी मार्गाला आणि त्यानंतर झाडाला धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

