Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

चार किलो अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला; एकास अटक!

चार किलो अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला; एकास अटक!

पिंपरी : बेकायदेशीरपणे एक लाख 91 हजार रुपये किंमतीचा तीन किलो 820 ग्रॅम अंमली पदार्थ वजनाचा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने त्याच्या कडून एक दुचाकीसह दोन लाख 21 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार 21 सप्टेंबर रोजी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास रघुनंदन वाशिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत, मौजे कातवीता, मावळ येथे करण्यात आली.

या प्रकरणी अनंत देवेंद्र रावण सहाय्यक पोलीस फौजदार, तळेगाव एमआयडीसी पोलीस यांनी फिर्याद दिली आहे. रुपेश कुमार लालबाबू सिंह (वय 19, सध्या- रा. हनमुठाण शिंदे यांच्या शेडमध्ये ,कातविता, मावळ, मुळगाव- वार्ड नंबर 10, पटोरी, पो. ठाणे द्वारवा माथापुर, जि. समस्तीपुर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्या ताब्यात 1 लाख 91 हजार रुपये किंमतीचा 3 किलो 820 मिलिग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला होता. पोलिसांनी आरोपीकडून बजाज कंपनीची लाल रंगाची प्लॅटिना दुचाकी मोटरसायकल सह एकूण 2 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी, पोलीस उपनिरीक्षक नवगिरे हे तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

बँकेने ताब्यात घेतलेल्या मिळकतीचे सील तोडून केले नुकसान!
पिंपरी : बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या मिळकतीचे सील तोडून बेकायदेशीररित्या मिळकतीमध्ये प्रवेश करून नुकसान केले .ही घटना 28 जुलै रोजी फ्लॅट नंबर दहा, इमारत क्रमांक एक, नीलमणी हाऊसिंग ऑफ सोसायटी, जी ब्लॉक, शाहूनगर येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने (वय 42, रा. फ्लॅट नंबर 24, बीके, एव्हेनु बिल्डिंग) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला आरोपी (वय 42) व त्यांचे पती उद्धव जे सूर्यवंशी (वय 54) यांच्याविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या मिळकतीचे सील तोडून आरोपीने मिळकती मधील दरवाज्याचे लॉक तोडून त्यामध्ये अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या प्रवेश करत बँकेने लावलेला बॅनर फाडून नुकसान केले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दशवंत हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"