Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

मकोका गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद!

मकोका गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद!

पिंपरी : मागील पाच महिन्यांपासून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदे अंतर्गत (मकोका) लावलेल्या फरार गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक लोखंडी पिस्टल, दोन लोखंडी मॅगझिन्स व दोन जिवंत राऊंड (काडतुसे) जप्त करून गुन्हेगारास पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

राहुल रमेश चव्हाण (वय 26, भारतमातानगर, दिघी) असे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत फरार असलेल्या आरोपीस खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पठारे मळा 90 फुटी रोड, म्हसोबा देवस्थान समोरील मोकळ्या जागेत, चऱ्होली बुद्रुक ता. हवेली येथे करण्यात आली.

indra dairy
indra dairy

पोलीस उप आयुक्त पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गणेश उत्सव सण सुरक्षित आनंदाने व शांततेने साजरा व्हावा यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप पोटे यांना राहुल रमेश चव्हाण यांचेकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचा आधार घेत गुन्हेगार राहुल चव्हाण याला पठारे मळा, ९० फुटी रोड ,म्हसोबा देवस्थान समोरील मोकळ्या जागेत, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली येथे सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 हजार रुपये किंमतीची एक लोखंडी पिस्टल, दोन लोखंडी मॅगझिन्स, दोन जिवंत राऊंड (काडतुसे) जप्त करण्यात आली. मागील पाच महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. दिघी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, किरण जाधव ,चंद्रकांत जाधव, संदीप गंगावणे यांच्या पथकाने केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"